महत्वाच्या बातम्या

 महाकाळ गावात वृद्ध महिलेस मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महाकाळ गावात एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेस मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला शकुंतला मनोहर नेहारे असून, त्यांच्या घरी ही घटना घडली.

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, शकुंतला नेहारे घरात असताना, नातेवाईक नारायण नेहारे घरासमोर येऊन अचानक शिवीगाळ करायला सुरुवात केली. शकुंतला यांनी त्याला का शिवीगाळ करतो, असे विचारले असता, नारायण याने जागेच्या वादातून संताप व्यक्त करत लोखंडी रॉडने त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात शकुंतला जखमी झाली.

तत्काळ स्थानिक रहिवाशांनी पोलीसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमी शकुंतला यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन स्थानिक रुग्णालयात दाखल केले.

पोलीस अधिक तपास करत असून, आरोपी नारायण नेहारे याविरुद्ध आवश्यक त्या कायदेशीर कारवाईची सुरूवात करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी अशा हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची मागणी केली आहे.





  Print






News - Wardha




Related Photos