हिंगणघाट येथे रोजगार मेळावा व प्लेसमेंट ड्राईव्ह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : अल्पमुदत प्रशिक्षण आयटीआय स्टेप अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या इच्छुक बेरोजगार उमेदवारांकरीता तसेच जिल्ह्यातील १२ वी, आयटीआय, पदवीधर व डिप्लोमाधारक उमेदवारांकरीता हिंगणघाट येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हिंगणघाट येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे ८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात नामांकीत कंपन्याच्यावतीने प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. इच्छुकांनी मुळ शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्रांसह मेळाव्यास उपस्थित राहावे, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी कळविले आहे.
News - Wardha




Petrol Price




