महत्वाच्या बातम्या

 भरडधान्य विक्रीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी करवी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : किमान आधारभुत किंमत खरेदी योजना रब्बी पणन हंगाम २०२५ - २०२६ अंतर्गत मका (भरडधान्य) विक्रीसाठी  ऑनलाईन शेतकरी नोंदणी ०१ एप्रिल २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत पुर्ण करावयाची असून खालील प्रमाणे केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.

अ.क्र     संस्थेचे नाव                                                                                      तालुका 
१.     तालुका सहकारी खरेदी विक्री सोसायटी                                                मोहाडी, मोहाडी

२.     दि पिंपळगाव सहकारी भात गिरणी मर्या.                                             पिंपळगाव लाखनी

३.     साकोली तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था मर्या,                  लाखन, साकोली

ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत नोंदणी केलेली नसेल त्यांनी संबंधीत केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणेसह, चालू हंगामाचा मका पिकाचा पिकपेरा (रब्बी २०२५-२०२६) नोंद असलेला शेतकऱ्यांचा ७/१२ उतारा, नमुना ८ अ, शेतकऱ्यांचे राष्ट्रीयकृत बँक पासबुकची अथवा रद्द धनादेशाची छायांकित प्रत, आधार कार्डची छायांकित प्रत तसेच शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे घेवून वरिल खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी पुर्ण करावी तसेच शेतकऱ्यांनी रब्बी पणन हंगाम २०२५-२०२६ मध्ये शासकीय किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ होण्याच्या दृष्टीने नोंदणीची प्रक्रीया पुर्ण करावी, असे आवाहन असे आवाहन सावन कुमार जिल्हाधिकारी जिल्हा पणन अधिकारी, भंडारा यांनी केलेले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos