भंडार्यात रेतीची चोरी : टिप्पर व ट्रॅक्टरसह दोन आरोपींवर गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : पालांदूर आणि दिघोरी पोलिसांनी रेतीची चोरी करणाऱ्या दोन चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई टिप्पर आणि ट्रॅक्टर वापरून रेतीची अवैध वाहतूक करत असलेल्या आरोपींविरोधात करण्यात आली.
पहिली कारवाई पालांदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मुरमाडी तुपकर शिवारात करण्यात आली. या प्रकरणी प्रेमचंद्र हरिश्चंद्र बागडे (३२, रा. दैतमागली) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. त्याच्या ताब्यातून टिप्पर आणि पाच ब्रास रेती जप्त करण्यात आली.
दुसरी कारवाई दिघोरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत बारव्हा-तई मार्गावर करण्यात आली. या प्रकरणात सुशील धनराज संजे (२६, रा. बारव्हा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अशा कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक रोखण्यात मदत होईल आणि परिसरात नियम पाळणीला प्रोत्साहन मिळेल.
News - Bhandara




Petrol Price




