महाराष्ट्रात ढगाळ हवामान : वादळी पाऊस आणि गारपीटची शक्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाने राज्यभरासाठी ३० मार्चपासून ढगाळ हवामानाचा इशारा दिला आहे. विभागाच्या अंदाजानुसार, ३० मार्च रोजी प्रामुख्याने खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातही काही प्रमाणात हवामान बदलू शकतो.
हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, ३१ मार्च रोजी वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, काही भागांमध्ये अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १ ते ४ एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील ठिकठिकाणी दुपारनंतर वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे हवामान विभागाने आवाहन केले आहे. मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी बाहेर जाणे टाळावे, असेही सुचवण्यात आले आहे.
News - Rajy




Petrol Price




