भंडारा : सुरेवाडा परिसरातील कालव्यात १७ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा पुनर्वसन परिसरातील कालव्यात आंघोळ करत असताना १७ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला. मृतकाचे नाव तुषार रवी हजारे आहे. ही घटना मंगळवार सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास घडली.
माहितीनुसार, तुषार मित्रांसोबत सुरेवाडा येथील कालव्यात आंघोळीसाठी गेला होता. पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्यामुळे तो बुडू लागला. त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली, परंतु मदत मिळेपर्यंत उशीर झाला आणि तुषारचे प्राण वाचवता आले नाहीत.
तुषार नुकताच दहावीची परीक्षा पूर्ण केली होती. सुट्टीच्या काळात तो आपल्या आई-वडिलांकडे सुरेवाडा येथे आला होता. या दुःखद घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
News - Bhandara




Petrol Price




