आजचे दिनविशेष


२१ मार्च महत्वाच्या घटना
१५५६ : ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणार्या आर्चबिशप थॉमस क्रॅनमर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.
१६८० : शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली.
१८५८ : इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ यांनी झाशीस वेढा दिला.
१८७१ : ऑटो व्हॉन बिस्मार्क हे जर्मनीचा चॅन्सेलर बनला.
१९३५ : शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.
१९७७ : भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
१९८० : अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.
१९९० : नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
२००० : फ्रेंच गयानातील कोअरु येथून एरियन ५०५ या वाहकाद्वारे भारताचा इन्सॅट ३ बी हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.
२००३ : जळगाव महानगरपालीकेची स्थापना.
२००६ : सोशल मीडिया साइट ट्विटर ची स्थापना झाली.
२०१२ : आंतरराष्ट्रीय वन दिन
२१ मार्च जन्म
१७६८ : फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १८३०)
१८४७ : कालजंत्रीकार बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९०६)
१८८७ : देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १९५४)
१९१६ : भारतरत्न शहनाईवादक बिस्मिल्ला खान यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट २००६)
१९२३ : सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २०११)
१९७८ : अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा जन्म.
१९४८ : संगणक शास्त्रज्ञ, :-) आणि :-( या पहिल्या इमोटीकॉन्सचे निर्माते स्कॉट फॅहलमन यांचा जन्म
१९२८ : नेपाळ देशाचे २४वे पंतप्रधान सूर्य बहादूर थापा यांचा जन्म (मृत्यू : १५ एप्रिल २०१५)
१९०४ : एम अँड एमचे (M&M) संस्थापक फॉरेस्ट मार्स सीनियर यांचा जन्म (मृत्यू : १ जुलै १९९९)
२१ मार्च मृत्यू
१९७३ : कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १८९१)
१९७३ : आतुन कीर्तन वरुन तमाशा या नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
१९८५ : ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह यांचे निधन. (जन्म: २० मार्च १९०८)
२००१ : दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाई चे स्थापक चुंग जू-युंग यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९१५)
२००३ : भारतीय लेखक शिवानी यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १९२३)
२००५ : चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक दिनकर द. पाटील यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १९१५)
२०१० : अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९२६)
२०१२ : स्विस आर्किटेक्टने हॅलेनस्टॅडियनचे रचनाकार ब्रुनो जियाकोमेटी यांचे निधन (जन्म: २४ ऑगस्ट १९०७)
१९९१ : अमेरिकन उद्योगपती, फेंडर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स कॉर्पोरेशन कंपनीचे संस्थापक लिओ फेंडर यांचे निधन (जन्म: १० ऑगस्ट १९०९)
१८४३ : मेक्सिको देशाचे पहिले राष्ट्रपती ग्वाडालुपे व्हिक्टोरिया यांचे निधन (जन्म: २९ सप्टेंबर १७८६)
२३५ : रोमन सम्राट अलेक्झांडर सेव्हरस (जन्म: १ ऑक्टोबर २०८)
News - todayspecialdays




Petrol Price




