आजचे दिनविशेष


१८ मार्च महत्वाच्या घटना
१८५० : हेन्री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेस ची स्थापना केली.
१९२२ : महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास.
१९४४ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.
१९६५ : अवकाशयात्री अलेक्सए लेओनोव १२ मिनिटे अंतराळात चालणारे पहिले वव्यक्ती ठरले.
२००१ : सरोदवादक अमजद अली खान यांना गंधर्व पुरस्कार तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना अप्सरा पुरस्कार जाहीर.
१८ मार्च जन्म
१५९४ : शहाजी राजे भोसले यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १६६४)
१८५८ : डिझेल इंजिनचा संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर १९१३)
१८६७ : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९४४)
१८६९ : इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९४०)
१८८१ : स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९५६)
१९०१ : शब्दकोशकार, अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक कृष्णाजी भास्कर तथा तात्यासाहेब वीरकर यांचा जन्म.
१९०५ : लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे २००१)
१९१९ : केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी २००१)
१९२१ : भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल २०१२)
१९३८ : अभिनेता बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा शशी कपूर यांचा जन्म.(मृत्यू : ४ डिसेंबर २०१७)
१९४८ : अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००५)
१९८९ : भारतीय क्रिकेट खेळाडू श्रीवत्स गोस्वामी यांचा जन्म.
१९६३ : पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन मिस अमेरिका, गायक व्हेनेसा विल्यम्स याचा जन्म
१८३७ : अमेरिकेचे २२वे आणि २४वे अध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड याचा जन्म (मृत्यू : २४ जून १९०८)
१८ मार्च मृत्यू
१९०८ : ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ सर जॉन इलियट यांचे निधन. (जन्म: २५ मे १८३१ – लॅम्सले, डरहॅम, यू. के.)
१९४७ : जनरल मोटर्स आणि शेवरलेट कंपनी चे सहसंस्थापक विल्यम सी ड्युरंट यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८६१)
२००१ : चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे निधन.
२००३ : ओस्बोर्न कॉम्पुटर कॉर्पोरेशन चे संस्थापक अॅडम ओस्बोर्न यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १९३९)
१९३६ : ग्रीस देशाचे ९३वे पंतप्रधान, ग्रीक वकील, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी एलिफथेरियोस व्हेनिझेलोस यांचे निधन (जन्म: २३ ऑगस्ट १८६४)
१७४५ : युनायटेड किंगडमचे पंतप्रधान, इंग्रजी राजकारणी रॉबर्ट वॉलपोल यांचे निधन (जन्म: २६ ऑगस्ट १६७६)
१००५ : व्हिएतनामी सम्राट ले होन यांचे निधन (जन्म: १० ऑगस्ट ०९४१)
News - todayspecialdays




Petrol Price




