टेक मंथन प्रोजेक्ट प्रदर्शनात बीआयटीच्या विद्यार्थ्यांची बाजी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी (पदविका) विभागातील विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट प्रदर्शन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर येथे १२ मार्च २०२६ रोजी आयोजित टेक मंथन प्रोजेक्ट एक्झिबिशनमध्ये विद्यार्थ्यांनी वर्ग निरीक्षण प्रणाली या प्रकल्पाचे प्रभावी सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत अंतिम वर्षातील भूमिका चटारे, अभिषेक नगराले, शिवपास समार आणि अनिशा कास्वते या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्कृष्ट सादरीकरण केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वर्गातील उपस्थिती, शिस्त व अध्यापन प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याची संकल्पना या प्रकल्पातून मांडण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत गोजे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार विभाग प्रमुख प्रा. बलवीर चंद, प्रकल्प समन्वयक प्रा. निकेतन रंगारी तसेच विभागातील सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि तांत्रिक कार्याचा लौकिक अधिक वाढल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
News - Chandrapur




Petrol Price




