महत्वाच्या बातम्या

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान  प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम : अभिनेते संदिप पाठक यांचा जिल्हा दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचार व प्रसिद्धीकरिता प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक हे १६ मार्च २०२६ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सदर दौऱ्यादरम्यान ते जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना भेट देऊन ग्रामपंचायतींनी केलेल्या विकासकामांची पाहणी करणार असून अभियानाबाबत जनजागृती करणार आहेत.

दौऱ्याचा कार्यक्रम -
सकाळी ९.३० वाजता – ग्रामपंचायत बेला, तालुका भंडारा
दुपारी १२.०० वाजता – ग्रामपंचायत केसलवाडा पवार, तालुका लाखनी
दुपारी ३.०० वाजता – ग्रामपंचायत खैरी / वलमाझरी, तालुका साकोली
सदर कार्यक्रमादरम्यान संबंधित ग्रामपंचायतींनी केलेल्या विविध विकासकामांची पाहणी तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद आयोजित करण्यात येणार आहे.

तरी भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत माहिती घेऊन कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद भंडारा मार्फत करण्यात आले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos