महत्वाच्या बातम्या

 मंत्रालय मुंबई येथे बांबू लागवडीला शेतपिकाचा दर्जा देण्याबाबत बैठक


- राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल व पाशजी पटेल यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न 

- बैठकीला माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांची उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : बांबू लागवडीला शेतपिकाचा दर्जा देण्याबाबत मुंबई मंत्रालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकमध्ये माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी उपस्थित होते.

बांबू लागवड सद्यस्थितीत वनविभागामार्फत केल्या जाते. परंतु शासनाने शेतकऱ्यांच्या शेतात बांबू लागवड करण्याचे ठरविले असून कृषी विभागमार्फत ही योजना राबविण्याचे विचाराधीन आहे. बांबूला शेतपिकाचा दर्जा दिल्यास बांबू लागवडीसाठी जिल्हा बॅंकेतून कर्ज उपलब्ध होऊ शकते आणि पिकविमा नुकसान भरपाईचा लाभ मिळेल.

बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी एक ते दीड लाखाचे उत्पन्न एकरी मिळू शकते. बांबू हे पर्यावरण पूरक पीक आहे आणि वातावरण असमतोलाचा कुठलाही परिणाम होत नाही.

बांबू लागवडीबाबत शेतकऱ्यांना सात लाख चार हजार रुपये. हेक्टरी अनुदान असल्याने शेतकऱ्याणी मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करून आपले उत्पन्न वाढवावे असे आव्हान करण्यात आले.

अटल बांबू मिशन, मनरेगा रोजगार हमी योजना, कृष्णी विभागामार्फत पोखरा योजने अंतर्गत लागवड केली जाते. या योजना एक संघ करून समान लागवड, खर्च निर्धारित करण्याचे ठरले असून या संपूर्ण योजना कृषी विभागामार्फत अमलबजावणी करण्याचे निचित करण्यात आले.

यावेळी कृषी राज्यमंत्री आशीषजी जैसवाल, महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, मनरेगा चे महासंचालक नदकुमार, कृषी आयुक्त वनविभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बांबू लागवडीबाबत शेतकऱ्यांना सात लाख चार हजार रुपये. हेक्टरी अनुदान असल्याने शेतकऱ्याणी मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करून आपले उत्पन्न वाढवावे असे आव्हान करण्यात आले.





  Print






News - World




Related Photos