मोहाडी तालुक्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर तहसीलदारांच्या पथकाची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : मोहाडी तालुक्यातील बोरी येथील रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर रविवार, ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार मोहाडी यांच्या पथकाने कारवाई केली. तपासणीत टिप्पर क्रमांक एमएच ४० डीसी ४२१३ या वाहनावर अवैध रेती वाहतुकीची गुन्हेगारी आढळली.
शासनाच्या निर्णयानुसार, दंडात्मक कारवाईसह इतर सर्व आवश्यक प्रक्रिया पार पाडण्यासाठी हे वाहन करडी पोलीस स्टेशन येथे ताब्यात घेण्यात आले आहे.
तहसीलदार पथकाच्या कारवाईमुळे परिसरात नियमांचे पालन आणि अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
News - Bhandara




Petrol Price




