कोरपणा येथील मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : कोरपणा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाला यश आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेत चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त केली.
प्राप्त माहितीनुसार, ३० जून २०२६ रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोरपणा हद्दीत कारवाई केली. या कारवाईदरम्यान गणेश राजू दर्शनवार (वय २६), रा. कोरपणा, ता. कोरपणा, जि. चंद्रपूर यास ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपीकडून कोरपणा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेली बजाज पल्सर १२५ मोटारसायकल जप्त करण्यात आली. जप्त वाहनाची अंदाजे किंमत ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर प्रकरणी कोरपणा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २६६/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. कारवाईनंतर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी कोरपणा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कांक्रेडवर, पोलीस हवालदार अजय बागेसर, किशोर वैरागडे, पोलीस अंमलदार गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, वृषभ बारसिंगे यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




