बाल विक्री प्रकरणात पोलिसांची कडक कारवाई : डॉ. नितेश वाजपेयीसह पाच जण अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : बाल विक्री प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी अटक केलेल्या डॉक्टर डॉ. नितेश वाजपेयीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. त्यामुळे त्याचा मुक्काम २२ फेब्रुवारीपर्यंत पोलिसांच्या कोठडीत राहणार आहे. या प्रकरणात डॉ. वाजपेयी मुख्य आरोपी म्हणून ओळखला जात असून, पोलिसांची अपेक्षा आहे की त्याच्याकडून अनेक महत्त्वपूर्ण माहिती मिळेल.
शुक्रवारी दिवसभराच्या तपासानंतर पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली. पूर्णिमा धुर्वे (३०) आणि उमेश सिंग गहलीत (४८) यांना गोंदिया येथून अटक करण्यात आली. यामुळे अटकेतील आरोपींची संख्या पाचवर पोहचली आहे. यापूर्वी लालेश्वरी सादेपाच (३९), सागर शिक्का (३८) आणि डॉ. नितेश वाजपेयी यांना अटक करण्यात आली होती.
तपास अधिक गतीने सुरू असून, डॉ. नितेश वाजपेयीच्या अटकेमुळे त्याच्या पुढील कबुलीमुळे तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. यामध्ये सागर शिक्काच्या पोलिस कोठडीची मुदत २१ फेब्रुवारीला संपणार आहे, आणि पोलिसांकडून त्याची कोठडी वाढवण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला जाऊ शकतो.
भंडारा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली, साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापूरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
News - Bhandara




Petrol Price




