महत्वाच्या बातम्या

 वृद्धाचा विषारी औषध प्राशन करून मृत्यू : भंडारा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : भालचंद रामजी कटरे (६६, सिहोरा, ता. तुमसर) या वृद्धाने विषारी औषध प्राशन केल्याने गंभीर स्थितीत उपचारासाठी मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ७ वाजता तुमसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भंडारा येथील खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले. येथे आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना, बुधवार, १८ फेब्रुवारी रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. वृद्धाने विषारी औषध प्राशन केल्याचे लक्षात येताच रुग्णालयात तातडीने उपचार सुरू केले होते, मात्र त्यांची जीव वाचवता आले नाही. या प्रकरणाची भंडारा पोलिसांनी नोंद घेतली असून तपास सुरू केला आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos