गड्डाटोली परिसरात तरुणाला घरातच मारहाण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : शहरातील गड्डाटोली परिसरात एका तरुणाला त्याच्याच राहत्या घरी मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. राकेश श्याम चौरसिया वय २४, रा. गड्डाटोली, गोंदिया असे जखमी तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी २९ राकेश चौरसिया हा आपल्या घरी असताना काही कारणावरून त्याच्यावर मारहाण करण्यात आली. या घटनेत तो जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया येथे दाखल करण्यात आले.
सध्या राकेश चौरसिया याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याची माहिती आहे. या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे. मारहाणीमागील कारण आणि संबंधित व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
या घटनेमुळे गड्डाटोली परिसरात नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
News - Gondia




Petrol Price




