महत्वाच्या बातम्या

  गोरेगावात आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुरदोली येथील भाऊराव दामा मरस्कोल्हे ( ४२) यांनी २२ जानेवारी रोजी मध्यरात्री सुमारे २ वाजताच्या सुमारास स्वतःचा गळा व हाताच्या धमन्या कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र, उपचार सुरू असतानाच २४ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर भाऊराव मरस्कोल्हे यांची प्रकृती अत्यवस्थ होती. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले, मात्र जखमा गंभीर असल्याने त्यांची प्रकृती सुधारली नाही. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी आवश्यक कार्यवाही केली. मृत्यू झाल्यानंतर २७ जानेवारी रोजी या प्रकरणाची नोंद गोरेगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

पुढील तपास गोरेगाव पोलिसांकडून सुरू असून, आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमकी कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.





  Print






News - Gondia




Related Photos