१२ डिसेंबर रोजी नागपूर येथे डाक अदालतीचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : टपाल विभागाबाबत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोस्टमास्टर जनरल नागपूर क्षेत्र नागपूर येथे १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. डाक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
डाक अदालतीमध्ये पोस्टाच्या कार्याविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे पध्दती निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार आहे. यामध्ये टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील.
तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदाहरनार्थ, तारीख व ज्या अधिकाऱ्यास मुळ तक्रार पाठविली असेल त्यांचे नाव, पद, इत्यादी. संबंधितांनी डाकसेवेबाबतची आपली तक्रार जयंत एस.दाऊ, सहाय्यक निदेशक, डाकसेवा एफ तथा सचिव डाक अदालत, पोस्ट मास्टर जनरल यांचे कार्यालय नागपूर क्षेत्र, शंकरनगर डाकघर कार्यालय, पहिला माळा नागपूर ४४००१० यांचे नावे दोन प्रतीसह १० डिसेंबर पुर्वी पोहोचेल या बेताने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, पोस्ट विभागाने कळविले आहे.
News - Wardha




Petrol Price




