महत्वाच्या बातम्या

 लिंगायत देवांग समाज संस्थेतर्फे स्वच्छता दूताचा भव्य सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : समाजसेवा आणि स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे स्वच्छता दूत परेश तावाडे यांचा लिंगायत देवांग समाज बहुउद्देशीय संस्था, सावली यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अनिल मुच्छलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन त्यांना गौरविण्यात आले.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बालू जंगावर, सोनाली कोंडकावार, संगीता जंगावर, पंकज चिलंगवार, राकेश कोंडकावार, सुनील मुच्छिलवार, प्राची जंगवार, दुर्गा कोंडकावार, नरेंद्र कस्तुरे, संजय श्रीरामे, साईनाथ भंडारे, संतोष कस्तुरे, जिजाबाई कस्तुरे, पल्लवी गुंडमवार आणि तेजश्री कोंडकावार यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

स्वच्छता ही केवळ जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य परेश तावडे करीत आहेत. त्यांच्या निःस्वार्थ सामाजिक कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले. अशा समाजसेवकांचा सन्मान केल्याने इतरांनाही सामाजिक कार्याची प्रेरणा मिळते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.





  Print






Related Photos