२५ व २६ नोव्हेंबर रोजी जिल्हा कोषागार कार्यालयात काढता येणार डिजीटल लाईफ सर्टिफिकेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन अखंडितपणे सुरू राहण्यासाठी जीवन प्रमाणपत्र (डिजीटल लाईफ सर्टिफिकेट) सादर करणे आवश्यक असते. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांच्या सोयीसाठी बुधवार २५ नोव्हेंबर आणि गुरुवार २६ नोव्हेंबर, या दोन दिवशी जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट काढण्याची सुविधा पूर्णवेळ (कार्यालयीन वेळेत) सुरू ठेवण्यात येत आहे. ज्या निवृत्तीवेतनधारकांचे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट अद्याप सादर करावयाचे बाकी आहे, त्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी तृप्ती टेमकर यांनी केले आहे.
आवश्यक कागदपत्रे : निवृत्ती वेतनधारकांनी आधार कार्ड, आधार संलग्न मोबाईल क्रमांक (ओटीपी साठी) आणि पीपीओ क्रमांक व बँक खाते पासबूक सोबत आणणे आवश्यक आहे.




Petrol Price




