राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्त भाजप महानगरच्या वतीने अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अद्वितीय शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रभक्तीचा आदर्श निर्माण करणाऱ्या झाशीच्या राणी वीरांगना लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने गांधी चौक येथील भाजप महानगर कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यपूर्ण जीवनकार्याचे स्मरण करून त्यांना मानवंदना दिली. इंग्रजांच्या अन्यायकारी सत्तेविरुद्ध त्यांनी दाखवलेले अदम्य धैर्य, स्वाभिमान आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी केलेले सर्वोच्च बलिदान भारतीय इतिहासात सदैव प्रेरणादायी राहील. प्रतिकूल परिस्थितीतही अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची जिद्द आणि राष्ट्राप्रती असलेली निष्ठा आजच्या पिढीसाठी आदर्श असल्याच्या भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष तथा नगरसेवक जितेश कुळमेथे, अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षा विमल काटकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष मयूर वाढई, महानगर कोषाध्यक्ष अमोल शेंडे, नगरसेविका ज्योती जीवणे, कामगार झोपडपट्टी अध्यक्ष रामकुमार आक्कापेल्लीवार, राकेश बोमनवार, नकुल वासमवार, ईश्वर वाघमारे, विनोद पेंलीवार, रीना साखरकर, मनीषा पडगेलवार, रेणुका येरणे, भाग्यश्री येरणे, रुबीना शेख, स्नेहा इंदूरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीचा आदर्श प्रत्येक भारतीयाच्या मनात सदैव प्रेरणा देत राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




Petrol Price




