भुसेवाडा बेली ब्रिजचे काम रखडले : CPI च्या तक्रारीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे खुलासा पत्र


- कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या तक्रारीची दखल; प्रत्यक्ष काम सुरू होऊन पूर्ण होईपर्यंत CPI चा पाठपुरावा सुरू राहणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : तालुक्यातील ग्रामपंचायत मल्लमपोडूर अंतर्गत भुसेवाडा गावाला जोडणाऱ्या मंजूर बेली ब्रिजचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. या प्रश्नावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (CPI) जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग, अहेरीच्या उपविभागीय अभियंत्यांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आलापल्ली यांना पत्र पाठवून कामाची सद्यस्थिती स्पष्ट केली आहे. खुलासा केला या पत्राची प्रत CPI कडेही माहितीसाठी पाठविण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रानुसार, भामरागड तालुक्यातील मलमपोडूर ते भुसेवाडा रस्त्यावरील ग्रामीण मार्ग क्रमांक ६७ येथे बेली ब्रिजच्या पायाभूत संरचनेचे (सब-स्ट्रक्चर) बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, GRSE, कोलकाता यांच्याकडून पुलाच्या मुख्य सांगाड्याचे (सुपरस्ट्रक्चर) बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे पोहोचमार्गाचे कामही प्रलंबित असल्याचे विभागाने नमूद केले आहे. यासंदर्भात GRSE ला २७ मे २०२५ रोजी पत्र पाठविण्यात आले होते.
कॉ. सचिन मोतकुरवार यांनी १७ ऑक्टोबर २०२६ रोजीतक्रार दाखल करून रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे आणि विलंबास जबाबदार असलेल्यांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली होती.अन्यथा जन आंदोलन असे बोलले पुलाअभावी भुसेवाडा येथील नागरिकांना दळणवळणाच्या अडचणींचा सामना करावा लागत असून, पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण होतो. विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि रुग्णांनाही याचा त्रास सहन करावा लागतो.
याबाबत कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, भुसेवाडा बेली ब्रिजचे काम तातडीने सुरू करून निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावे. केवळ पत्रव्यवहार न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे आवश्यक आहे.बेली ब्रिजचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होऊन ते पूर्ण होईपर्यंत CPI चा पाठपुरावा सुरूच राहील. प्रशासनाने दिरंगाई केल्यास जनतेच्या हक्कासाठी ग्रामस्थांना सोबत घेऊन आवश्यकतेनुसार लोकशाही मार्गाने आंदोलनही करण्यात येईल. यावेळी CPI चे जिल्हा सदस्य कॉ. सूरज जक्कुलवार आणि भुसेवाडा येथील नागरिकांनीही बेली ब्रिजचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.




Petrol Price




