महत्वाच्या बातम्या

 आईला चाकू मारण्याची धमकी देणाऱ्या भावाचा लहान भावानेच केला खून


- दारूच्या नशेत आईला शिवीगाळ; कळमना हद्दीत सख्ख्या भावांमध्ये वादाचे पर्यवसान हत्येत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : आईला शिवीगाळ करून चाकू मारण्याची धमकी देणाऱ्या दारुड्या भावाचा त्याच्याच लहान भावाने चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री घडली. या घटनेमुळे पाचझोपडी, मिनीमातानगर परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेत मोहन चिंताराम बांते (२१) याचा मृत्यू झाला असून, त्याचा लहान भाऊ समीर चिंताराम बांते (१९) हा या प्रकरणातील आरोपी आहे. दोघेही सख्खे भाऊ असून, ते पाचझोपडी, मिनीमातानगर परिसरात राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री मोहन हा दारूच्या नशेत घरी आला. त्यानंतर त्याने आईला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने आईला चाकू मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण झाले.

आईला चाकू मारण्याची धमकी दिल्याने लहान भाऊ समीर याने मोहनला विरोध केला. त्यातून दोन्ही भावांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर समीरने चाकूने मोहनवर हल्ला केला. या हल्ल्यात मोहन गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेची माहिती घेत तपास सुरू केला आहे. 





  Print






Related Photos