महत्वाच्या बातम्या

 ६ नोव्हेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : डाक विभागाशी संबंधित नागरिकांच्या विविध तक्रारींचे निराकरण करण्यासाठी येत्या ६ नोव्हेंबर २०२६ रोजी विभागीय डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही अदालत दुपारी ३ वाजता प्रवर अधीक्षक, मुख्य पोस्ट ऑफिस, चंद्रपूर यांच्या दालनात पार पडणार आहे. डाक सेवांबाबत समस्या किंवा तक्रारी असलेल्या नागरिकांना आपली बाजू मांडून तक्रारींच्या निवारणासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

डाक विभागामार्फत नागरिकांना विविध प्रकारच्या टपाल आणि इतर सेवा पुरविल्या जातात. मात्र, या सेवांचा लाभ घेताना काही वेळा नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा तक्रारींची दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने विभागीय स्तरावर डाक अदालतीचे आयोजन केले जाते. या अदालतीमध्ये डाक विभागाशी संबंधित तक्रारी मांडता येणार असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास समस्या आणून देता येतील.

त्यामुळे डाक विभागाच्या सेवांबाबत काही तक्रारी किंवा अडचणी असल्यास संबंधित नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.नागरिकांनी आपल्या तक्रारींसह ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता चंद्रपूर येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये उपस्थित राहावे, असेही कळविण्यात आले आहे. या विभागीय डाक अदालतीच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





  Print






Related Photos