वरोऱ्यात जागतिक रेबीज दिनानिमित्त मोफत अँटी-रेबीज लसीकरण शिबिर संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : जागतिक रेबीज दिनानिमित्त वरोरा येथे विविध सामाजिक व शासकीय संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीपर उपक्रम आणि मोफत अँटी-रेबीज लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ वरोरा, पशुसंवर्धन विभाग (महाराष्ट्र शासन), रोटरॅक्ट क्लब, इनरव्हील क्लब, नगर परिषद वरोरा तसेच डॉग अँड पेट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. राहुल शेंदरे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वरोऱ्याचे आमदार करणभाऊ देवतळे यांनी भूषवले. यावेळी इनरव्हील क्लबचे अध्यक्ष स्नेहल पत्तीवार, उपाध्यक्ष प्रतिभा मणियार, सचिव प्राजक्ता कोहळे, माधवी शेंद्रे, प्रिया टोंगे, मानसी चिकनकर,सीमा लाहोटी, इत्यादी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिस डॉग स्क्वॉड ठरले मुख्य आकर्षण या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे चंद्रपूर पोलिस डॉग स्क्वॉडचे विशेष प्रात्यक्षिक ठरले. श्वानांच्या पथकाने सादर केलेल्या कौशल्यांनी उपस्थितांचे मन जिंकले आणि उपस्थितांकडून त्यांना उत्स्फूर्त दाद मिळाली.
शेतकरी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रेबीजसारख्या जीवघेण्या आजाराबाबत जनजागृती करणे, पाळीव प्राण्यांचे वेळेवर लसीकरण करणे आणि नागरिकांमध्ये प्राण्यांप्रती सुरक्षित व जबाबदार वर्तनाची जाणीव निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश होता.
या औचित्याने सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आनंद चौक येथील डॉग अँड पेट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉ. राहुल शेंदरे यांचे हॉस्पिटल मोफत अँटी-रेबीज लसीकरण शिबिर पार पडले. या शिबिराला वरोरा शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या पाळीव प्राण्यांना लसीकरण करून घेतले. विविध संस्थांच्या सहकार्यातून झालेला हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.




Petrol Price




