महत्वाच्या बातम्या

 सेवा पंधरवाडाअंतर्गत ग्रामपंचायत चिचखेडा येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / भंडारा : सेवा पंधरवाडा-२०२५ चे औचित्य साधुन गाव भेट गुरूवार या उपक्रमांतर्गत ०३ सप्टेंबर २०२६ रोजी पवनी तालुक्यातील चिचखेडा पुनर्वसन या गावात  सावन कुमार जिल्हाधिकारी भंडारा यांनी सदिच्छा भेट दिली. छोटेखानी कार्यक्रमात ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, सचिव, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व संबंधित विभागाचे अधिकारी यांचे उपस्थितीत गावातील समस्येबाबत चर्चा करण्यात आली. 

गावामध्ये अपूर्ण असलेल्या नागरी सुविधा व इतर समस्या पूर्ण करण्याबाबत सरपंच चिचखेडा यांनी जिल्हाधिकारी निवेदन सादर केले. निवेदनाचे अनुषंगाने, संबंधित विभाग प्रमुखांना कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश  जिल्हाधिकाऱ्यांना दिले.





  Print






Related Photos