रेल्वे अपघातात व्यक्तीचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : भूगाव रेल्वे स्थानक परिसरात झालेल्या रेल्वे अपघातात ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेची नोंद अल्लीपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
मृत व्यक्तीची ओळख प्रदीप प्रभू तिकडे ५२,वर्षे रा. जांब, जि. अकोला अशी झाली आहे. अपघात नेमका कसा घडला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
याप्रकरणी प्रफुल्ल महादेव नायक यांनी अल्लीपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृत्यूचे नेमके कारण तसेच अपघाताची परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
News - Wardha




Petrol Price




