महत्वाच्या बातम्या

 जुगार अड्ड्यावर भद्रावती पोलिसांची धाड : पाच जणांविरुद्ध गुन्हा, दोन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भद्रावती शहरातील पाटील नगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भद्रावती पोलिसांनी रविवारी दुपारी धाड टाकून पाच जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत तीन मोटारसायकली, पाच मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख १४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पाटील नगर येथे काही जण पैशांची बाजी लावून पत्त्यांचा हार-जीतचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून जुगार सुरू असताना पाच जणांना ताब्यात घेतले.

कारवाईत धनराज कवड्डुजी कांबळे ६३ वर्षे रा. पंचशील नगर, धर्मराज नामदेव गायकवाड ६६ वर्षे रा. पटेल नगर, रविंद्र बापुराव माकोडे ५२ वर्षे रा. किल्ला वार्ड, अमोल शामराव दुरडकर ३४ वर्षे रा. शिवाजी नगर आणि देवानंद खुशरंग पाटील ५२ वर्षे रा. सुमठाणा, ता. भद्रावती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  

आरोपींची अंगझडती तसेच घटनास्थळाची तपासणी केली असता तीन मोटारसायकली, पाच मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख १४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७१५/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात

पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, गजानन तुपकर, सहाय्यक फौजदार महेंद्र बेसरकर, पोलीस हवालदार अनुप आस्टूनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार तसेच पोलीस अंमलदार खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos