महत्वाच्या बातम्या

 सिंदी रेल्वे-बरबडी मार्गावर दुचाकी अपघात : चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू


- अमोल शेंडे यांच्यावर काळाचा घाला; सिंदी रेल्वे पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सिंदी रेल्वे ते बरबडी मार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमोल अरुण शेंडे ३५ वर्षे रा. आजनगाव असे मृताचे नाव असून, या प्रकरणी सिंदी रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल शेंडे हे त्यांच्या दुचाकी क्र. एमएच-३२-यू-५०३४ वरून सिंदी रेल्वे ते बरबडी मार्गाने जात असताना अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असताना प्रकृती गंभीर बनली. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

घटनेची माहिती मिळताच सिंदी रेल्वे पोलिसांनी आवश्यक कार्यवाही करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.





  Print






News - Wardha




Related Photos