जिल्हयातील पात्र सेवा सहकारी संस्थानी कामाचे प्रस्ताव सादर करावेत.

- अटी व शर्ती या कार्यालयाचे नोटीस बोर्डावर उपलब्ध आहेत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भंडारा सुशिक्षित बेरोजगार सेवा सोसायटयांना रु.१०/ लाखापर्यत काम वाटप करण्याबाबत प्राप्त झालेले आहे. हे काम सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थाना, शासन निर्णय क्रमांक कौविउ - २०२१/ प्र.क्रं.१४०/ प्रशा.२ दिंनाक २८ ऑगस्ट़ २०२४ नुसार कामे वाटप समीती मार्फत घ्यावयाची आहेत.
या कामाचे इत्यादीचा सविस्तर तपशिल जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्र, छत्रपती शिवाजी महाराज क्रिंडा संकुल, भंडारा तसेच भंडारा जिल्हा सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था संघ मर्या,भंडारा यांचे कार्यालयातील संबधीत कक्षातही त्यांनी पाठविलेल्या पत्राच्या प्रती पाहावयास उपलब्ध आहेत तरी खालील अटी व शर्ती मान्य असल्यास व त्याची पुर्ती करण्यास तयार असलेल्या,जिल्हयातील पात्र सेवा सहकारी संस्थानी कामाचे प्रस्ताव सादर करावेत. तसेच काम देणा-या संस्थेच्या अटी व शर्ती हया कार्यालयाचे नोटीस बोर्डावर उपलब्ध आहेत
संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, २.सेवा सोसायटीच्या बैक पासबुकची मागील १ वर्षाची उलाढाल दर्शविणा-या पानाची प्रत पासबुक च्या पहील्या पानाच्या झेरॉक्झ़ प्रतिसह, 3.सेवा सोसायटीने मागील 1 वर्षात केलेल्या कामाबाबतचे कार्यादेश व अनुभवा प्रमाणपत्र,4.सेवा सोसायटीचा लेखा परिक्षण अहवाल सन २०२५ -२६, ५. सेवा सोसायटी कार्यरत असलेल्या ठिकाणचे Address proof उदा.टेलीफोन /इलेक्ट्रीक बील/वार्ड मेंबर्सचा दाखला ईत्यादीची. प्रत ६ .सेवा सोसायटीने सदस्यंना दिलेले ओळखपत्रे व सर्व सदस्य क्रियाशिल असल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडावे दोन्ही प्रमाणपत्र वेगवेगळे असावे ७. संस्थेचे उदेश व उपविधीची प्रत सोबत जोडावी उपवीधीची प्रत अपुरी नसावी८ .संस्थेने नमुद केलेली माहीती व सोबत जोडलेलया सर्व प्रपत्रातील माहीती सत्य़ असल्याबाबतचे सेवासोसायटी अध्य़क्षांचे प्रमाणपत्र सोबत जोडावे. ९ .संस्थेमधील सर्व सभासदांचे महास्व़्यम पोर्टल वरुन एक वर्षाचे आत कालावधीतील download केलेले एम्प़लॉयमेंट कार्ड ( Jobseeker Receipt १०. सेवा सहकारी संस्थ़ेचे सभासद शासकीय किंवा निमशायकीय नोकरीस नसल्याचे प्रमाणपत्र.
तरी वरील कामाच्या अटी व शर्ती पुर्ण करीत असलेल्या.भंडारा जिल्हयातील इच्छ़ुक व पात्र सेवा सहकारी संस्थ़ानी आपले परीपुर्ण व स्वतंत्र प्रस्ताव संस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्रासह व सर्व अन्य़ आवश्य़क प्रमाणपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केद्र,छत्रपती शिवाजी महाराज क्रिंडासंकुल, भंडारा यांच्याकडे ३ ऑगस्ट, २०२६ सायंकाळी ५.०० पर्यत सादर करावे. त्यानंतर प्राप्त़ होणाऱ्या प्रस्तावांचा अथवा प्राप्त़ प्रस्तावातील अन्य़ प्रपत्राचा स्वीकार केला जाणार नाही. असे सहायक आयुक्त् , जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा तथा सदस्य़ सचिव कामे वाटप समीती हे कळवित आहेत.
News - Bhandara




Petrol Price




