पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा २४ जुलै रोजी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यशवंत महाविद्यालय व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठ नागपुरच्या संयुक्त विद्यमाने २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता यशवंत महाविद्यालय, वर्धा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात एलआयसी पुलगाव, सगुणा फूड्स हिंगणघाट, संस्कार ॲग्रो वायगाव, उत्कर्ष स्मॅाल फायनन्स नागपुर, वैभव एंटरप्रायझेस, कोल्ब्रो नागपूर, औरंगाबाद ॲटो मशिनरी, एनएसएसएल हिंगणा, शिवशक्ती ॲग्रोटेक नागपूर आदी नामांकित कंपन्या सहभागी होणार आहे. या कंपन्यांकडे रिक्त असलेल्या ट्रेनिंग, मेकॅनिक, ऑपरेटर, सर्व्हेअर, विमा सखी, एलआयसी एजंट आदी विविध पदांसाठी सुमारे २०० रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत.
उमेदवार दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर, डिप्लोमाधारक तसेच बीएससी, एमएससी केमिस्ट्री उत्तीर्ण उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. मेळाव्यात बेरोजगार उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असून इच्छुकांनी आपल्या मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ.सु.रा. झळके यांनी केले आहे.
News - Wardha




Petrol Price




