उपचारासाठी रुग्णालयात आणलेल्या तरुणाला डॉक्टरांनी केले मृत घोषित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : चिचगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिचगड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलेल्या एका ३८ वर्षीय तरुणाला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर मृत घोषित केल्याची घटना शनिवारी १८ सकाळी घडली. या प्रकरणी चिचगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजोग झभर मरई ३८ वर्षे, रा. कोकोडी, ता. देवरी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना शनिवारी सकाळी सुमारे ८.४० वाजता उपचारासाठी चिचगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच चिचगड पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. याप्रकरणी चिचगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
News - Gondia




Petrol Price




