मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूरमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, बल्लारपूरच्या वतीने राणी हिराई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टी बल्लारपूर शहराध्यक्ष ॲड. रणंजय सिंह तसे यूथ क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाश प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांचा उत्साह वाढविला. तसेच ॲड. रणंजय सिंह यांच्या हस्ते रक्तदात्यांना विशेष प्रोत्साहनपर भेटवस्तू व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे उपस्थितांनी कौतुक केले. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे हे महत्त्वपूर्ण माध्यम आहे, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता युवा मोर्चा, बल्लारपूरचे अध्यक्ष मिथलेश खेंगर, सहसंयोजक तथा दक्षिण भारतीय प्रकोष्ठाचे अध्यक्ष प्रशांत दारला, महामंत्री रामेश्वर पासवान, विकी (शांतीकुमार) लालवानी, अरविंद वर्मा, सुधाकर पारधी तसेच सोशल मीडिया प्रमुख यश नील यांनी विशेष परिश्रम घेतले.
या शिबिराला भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे रक्तदान – महादान, मानवसेवा हीच सर्वोच्च सेवा हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला.
News - Chandrapur




Petrol Price




