महत्वाच्या बातम्या

 महराजस्व अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओ संगीता उमरे यांचा सन्मान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण SIR – २०२६ मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ संगीता गजानन उमरे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विशेष पुनरीक्षण मोहिमेत उमरे यांनी आपल्या मतदान केंद्र क्षेत्रातील गणना प्रपत्रांचे Enumeration Form–EF शंभर टक्के वितरण तसेच १०० टक्के डिजिटायझेशन विहित मुदतीत अचूकपणे पूर्ण केले. त्यांच्या कर्तव्यदक्ष आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन प्रदान करण्यात आले.

हा सन्मान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बल्लारपूर नगराध्यक्षा अल्का वाढई, उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा, तहसीलदार तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी रेणुका कोकाटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.

उत्कृष्ट कामगिरीबद्दल संगीता उमरे यांचे उपस्थितांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.





  Print






News - Chandrapur




Related Photos