पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा १७ जुलै रोजी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार धोरणानुसार जागतिक कौशल्य विकास दिनाचे औचित्य साधून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा आणि समृद्धी प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवळी यांच्या संयुक्त विद्यमाने १७ जुलै रोजी सकाळी १० वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा तथा प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले आहे.
समृद्धी प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवळी येथे होणाऱ्या या मेळाव्यात वैभव एंटरप्रायझेस, नागपूर अंतर्गत सन्वीजय इन्फ्रास्ट्रक्चर बुटीबोरी, स्पेसवूड ऑफिस सोल्यूशन नागपूर, लिंक अप टेक्सटाईल्स, सगुणा फूड्स प्रा. लि. हिंगणघाट, ऑटो मशिनरी प्रा. लि., कोल्ब्रो नागपूर, एलआरसी पुलगाव, संस्कार ॲग्रो वायगाव तसेच अरिका स्पिनटेक वायगाव-निपाणी, उत्कर्ष स्माल फायनन्स नागपूर आदी नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.
या रोजगार मेळाव्यात ट्रेनिंग मेकॅनिक, ऑपरेटर, सर्व्हेअर, विमा सखी, एलआयसी एजंट आदी विविध पदांसाठी सुमारे २१९ रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत. दहावी, बारावी, आयटीआय सर्व ट्रेड, पदवीधर, डिप्लोमा धारक तसेच बीएससी, एमएससी केमिस्ट्री उत्तीर्ण उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
सदर रोजगार मेळाव्यात बेरोजगार उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असून इच्छुकांनी आपल्या मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ. सु.रा. झळके यांनी केले आहे.
News - Wardha




Petrol Price




