आजचे दिनविशेष


१४ जुलै महत्वाच्या घटना
१७८९ : पॅरिस मध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची मुहूर्तमेढ होती.Birthdays & Name Days
१८६७ : आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.
१९५८ : इराक मध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
१९६० : चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. ४५ वर्षे त्यांनी संशोधन केले.
१९६९ : अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या.
१९७६ : कॅनडात मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.
२००३ : जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.Government
२०१३ : डाकतार विभागाची १६० वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली.
१४ जुलै जन्म
१८५६ : थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा टेंभू कराड येथे जन्म. (मृत्यू: १७ जून १८९५)
१८६२ : ऑस्ट्रियन चित्रकार गुस्टाफ क्लिम्ट यांचा जन्म.
१८८४ : महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७०)
१८९३ : भारतीय कवी आणि लेखक गारिमेला सत्यनारायण यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १९५२)Holidays & Seasonal Events
१९१० : टॉम अँड जेरीची चित्रे काढणारा चित्रकार विल्यम हॅना यांचा जन्म.
१९१७ : संगीतकार रोशनलाल नागरथ ऊर्फ रोशन यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६७)
१९२० : केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी २००४)
१९४७ : मॉरिशसचे तिसरे व सहावे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांचा जन्म.
१९६७ : श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि राजकारणी हशन तिलकरत्ने यांचा जन्म.
१९६१ : जगातील पहिली एकट्याने मानव-शक्ती प्रदक्षिणा पूर्ण करणारे एर्डन एरुस यांचा जन्म
१९०३ : क्युबा देशाचे अध्यक्ष कार्लोस प्रियो सोकारास यांचा जन्म (मृत्यू : ५ एप्रिल १९७७)Time & Calendars
१४ जुलै मृत्यू
१९०४ : दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी पॉल क्रुगर यांचे निधन.
१९३६ : भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १८९०)
१९६३ : योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १८८७)
१९७५ : संगीतकार मदनमोहन यांचे निधन. (जन्म: २५ जून १९२४)
१९९३ : करवीर संस्थानच्या महाराणी श्रीमंत विजयमाला राणीसाहेब यांचे निधन.
१९९८ : मॅकडॉनल्ड चे सहसंस्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १९०९)Birthdays & Name Days
२००३ : हिंदी चित्रपट अभिनेत्री लीला चिटणीस यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १९०९)
२००३ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९२२)
२००८ : सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १९२०)
१९५४ : स्पॅनिश नाटककार - नोबेल पुरस्कार जॅसिंटो बेनाव्हेंटे यांचे निधन (जन्म: १२ ऑगस्ट १८६६)
१७६६ : चेक वास्तुविशारद, वेलट्रुसी हवेलीचे रचनाकार फ्रॅन्टिसेक मॅक्समिलियन कांका यांचे निधन (जन्म: ९ ऑगस्ट १६७४)
News - todayspecialdays




Petrol Price




