महत्वाच्या बातम्या

 महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी येथे छात्रों की गुंज : शिक्षा बचाओ, देश बचाओ कार्यक्रम उत्साहात संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शन व आवाहनानुसार महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी येथे छात्रों की गुंज – शिक्षा बचाओ, देश बचाओ या विद्यार्थी जनजागृती कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, संविधानिक मूल्ये, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार तसेच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवकांची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शिक्षण हीच देशाच्या प्रगतीची खरी ताकद असून विद्यार्थ्यांनी संविधानिक मूल्ये जपत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेले मार्गदर्शन चित्रफितीद्वारे दाखविण्यात आले. बदलत्या शैक्षणिक धोरणांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षण, रोजगार आणि भविष्यातील संधींवर होणारा परिणाम याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज गुड्डेवार, नगरसेवक माणिक भोयर, नगरसेविका मेघाताई मने, नगरसेवक अक्षय बागडे, ज्येष्ठ नेते शालिक पत्रे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, एनएसयूआय महाराष्ट्र प्रदेशचे सचिव निशांत वनमाळी, श्रीनिवास आंबटवार, वैभव गोलाईत, पवन भोयर, विजय सुपारे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos