महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१२ जुलै महत्वाच्या घटना

१६७४ : शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.Astrology & Divination

१७९९ : रणजित सिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.

१९२० : पनामा कालव्याचे औपचारिक उद्‍घाटन झाले.

१९३५ : प्रभातचा चन्द्रसेना हा मराठी चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

१९६१ : पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यातील पुरात २,००० लोक मृत्यूमुखी, १,००,००० लोक विस्थापित झाले.

१९६२ : लंडनमधील मार्क्वी क्लबमधे द रोलिंग स्टोन्स चा पहिला कार्यक्रम झाला.

१९७९ : किरिबातीला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९८२ : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना झाली.Language Resources

१९८५ : पी. एन. भगवती भारताचे १७ वे सरन्यायाधीश झाले.

१९९५ : अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

१९९८ : १६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.

१९९९ : महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान.

२००१ : कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना टिळक पुरस्कार प्रदान.

१२ जुलै जन्म

१०० : १०० ई .पूर्व : रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांचा जन्म.Geographic Reference

१८१७ : अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्‍री थोरो यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १८६२)

१८५२ : अर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष हिपोलितो य्रिगोयेन यांचा जन्म.

१८५४ : संशोधक इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक जॉर्ज इस्टमन यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १९३२)

१८६३ : इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा जन्म.

१८६४ : अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९४३)

१८६४ : इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर १९२६)Time & Calendars

१९०९ : प्रथितयश दिग्दर्शक बिमल रॉय यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९६६)

१९१३ : इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून २०१०)

१९२० : सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंतविष्णू चंद्रचूड यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००८)

१९४७ : भारतीय क्रिकेट खेळाडू पूचिया कृष्णमूर्ती यांचा जन्म.

१९६१ : भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते शिव राजकुमार यांचा जन्म.

१९६५ : क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा जन्म.

१९४९ : भारतीय क्रिकेट खेळाडू नारायण साठम यांचा जन्म (मृत्यू : १२ फेब्रुवारी २०२३)

१९३३ : अमेरिकन अभियंते, डेटापॉइंट २२००चे निर्माते व्हिक्टर पुअर यांचा जन्म (मृत्यू : १७ ऑगस्ट २०१२)

१९३१ : भारतीय रोमन कॅथलिक प्रीलेट जोसेफ मिट्टाथनी यांचा जन्म (मृत्यू : ११ जुलै २०२२)

१९२८ : भारतीय लेखक आणि कथाकार सुब्बू अरुमुगम यांचा जन्म (मृत्यू : १० ऑक्टोबर २०२२)

१२ जुलै मृत्यू

१६६० : बाजी प्रभू देशपांडे यांचे निधन.

१९१० : रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक चार्ल्स रोलस् यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १८७७)

१९४९ : आयर्लंड चे पहिले राष्ट्राध्यक्ष डग्लस हाइड यांचे निधन.

१९९४ : हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथाकार वसंत साठे यांचे निधन.Language Resources

१९९९ : हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्र कुमार यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९२९)

२००० : मराठी कवयित्री इंदिरा संत यांचे निधन.

२०१२ : मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारासिंग यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९२८)

२०१३ : चित्रपट अभिनेता प्राणकृष्ण सिकंद ऊर्फ प्राण यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १९२०)

२०१३ : बोस कॉर्पोरेशन चे स्थापक अमर बोस यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १९२९)

२०२२ : भारतीय सामाजिक कार्यकर्ता आणि शैक्षणिक - पद्मश्री अवधश कौशल यांचे निधन

२००१ : तंत्रज्ञान अग्रणी देवांग मेहता यांचे निधन (जन्म: १० ऑगस्ट १९६०)Time & Calendars

१९३२ : बाटा शूज कंपनीचे संस्थापक टॉमस बाटा यांचे निधन (जन्म: ३ एप्रिल १८७६)

१९३१ : स्वीडिश आर्चबिशप, इतिहासकार आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार विजेते नॅथन सॉडरब्लॉम यांचे निधन (जन्म: १५ जानेवारी १८६६)

१८९२ : बेसबॉलचे जनक अलेक्झांडर कार्टराईट यांचे निधन (जन्म: १७ एप्रिल १८२०)

१५७६ : बंगालच्या करानी साम्राज्याचा शेवटचा शासक दाऊद खान करानी यांचे निधन





  Print






News - todayspecialdays




Related Photos