महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


८ जुलै महत्वाच्या घटना

१४९७ : वास्को द गामा युरोपातून भारताच्या पहिल्या सफरीवर निघाला.

१८५६ : चार्ल्स बर्न यांना मशीनगन चे अमेरिकेतील पेटंट मिळाले.

१८८९ : द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला.

१९१० : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मोरिया या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.

१९३० : किंग जॉर्ज-५वे यांच्या हस्ते लंडनमध्ये इंडिया हाऊसचे उद्‍घाटन झाले.

१९५८ : बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आँखे बारह हाथ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.

१९९७ : बीजिंग येथील आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.

२००६ : मुख्यनिवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

२०११ : रुपयाचे नवीन चिन्ह (Rs.) असलेली नाणी चलनात आली.

१९८८ : लंडन सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन (London SPCC) - स्थापना

८ जुलै जन्म

१७८९ : मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १८५८)

१८३१ : कोकाकोला चे निर्माते जॉन पंबरटन यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १८८८)Time & Calendars

१८३९ : रॉकफेलर घराण्यातील पहिला उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९३७)

१८८५ : ह्यूगो बॉस चे स्थापक ह्यूगो बॉस यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट १९४८)

१९१४ : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१०)

१९१६ : साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार गो. नी. दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९९८)

१९२२ : मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २००९)

१९४९ : आंध्र प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा जन्म.Holidays & Seasonal Events

१९७२ : भारताचे क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांचा जन्म.

१९१९ : जर्मनी देशाचे ४थे अध्यक्ष, जर्मन राजकारणी वॉल्टर स्केल यांचा जन्म (मृत्यू : २४ ऑगस्ट २०१६)

१९०६ : पीपीजी प्लेस आणि क्रिस्टल कॅथेड्रलचे रचनाकार, अमेरिकन रचनाकार फिलिप जॉन्सन यांचा जन्म (मृत्यू : २५ जानेवारी २००५)

८ जुलै मृत्यू

१६९५ : डच गणितज्ञ, खगोलविद आणि पदार्थवैज्ञानिक क्रिस्टियन हायगेन्स यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १६२९)

१८३७ : इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १७६५)

१९६७ : ब्रिटिश अभिनेत्री विवियन ली यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९१३)

१९८४ : पद्मश्री विजेते गोमंतकीय कवी ‘बाकीबाब’ उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १९१० )

१९९४ : उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किमसुंग २रे यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९१२)

१९९४ : मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक गोवा पुराभिलेखचे संचालक डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे यांचे निधन.

२००१ : प्रसिद्ध तबला वादक उस्ताद बाबासाहेब मिरजकर याचे निधन.

२००३ : संत साहित्याचे अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर यांचे निधन.

२००६ : तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक लेखक प्रा. राजा राव यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९०८)Time & Calendars

२००७ : भारताचे ८वे पंतप्रधान चंद्रा शेखर यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९२७)

२००८ : महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन.

२०१३ : भारतीय लेखक सुन्द्री उत्तमचंदानी यांचे निधन. (जन्म: २८ सप्टेंबर १९२४)

२०२२ : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ऍबे यांचे निधन (जन्म: २१ सप्टेंबर १९५४)

२०२२ : मेक्सिको देशाचे ५०वे अध्यक्ष लुईस इचेव्हेरिया यांचे निधन (जन्म: १७ जानेवारी १९२२)

२०२० : भारतीय विनोदी अभिनेते सुरमा भोपाली यांचे निधन (जन्म: २९ मार्च १९३९)Holidays & Seasonal Events





  Print






News - todayspecialdays




Related Photos