वरोऱ्यात धारदार तलवारीसह विधिसंघर्षग्रस्त बालक एलसीबी च्या ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुडकी (चिनोरा) परिसरात अवैधरित्या विनापरवाना धारदार लोखंडी तलवार बाळगणाऱ्या एका विधिसंघर्षग्रस्त बालकावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवारी ७ जुलै स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हुडकी (चिनोरा) येथे छापा टाकला. कारवाईदरम्यान १७ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या ताब्यातून विनापरवाना बाळगलेली एक धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.
या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७९३/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात पोलीस हवालदार जयसिंह, संतोष येलपुलवार, सचिन गुरनुले, पोअं विठ्ठल काकडे, दिनेश आरडे यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




