महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१ जुलै महत्वाच्या घटना

१६९३ : संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला.

१८३७ : जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली.

१८७४ : पहिले व्यावसायिक टंकलेखन यंत्र (टाइपराइटर) ची विक्री सुरु झाली.

१८८१ : जगातील पहिला टेलिफोन कॉल करण्यात आला.

१९०३ : पहिल्या टूर डी फ्रान्स सायकल रेसची सुरवात झाली.

१९०८ : एसओएस (SOS) हे आंतरराष्ट्रीय तत्काळ चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले.

१९०९ : क्रांतिकार कमदनलाल धिंग्रा यांनी कर्नल विल्यम कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली.

१९१९ : कै. बाबूराव ठाकूर यांनी तरुणभारत वृत्तपत्राची सुरुवात.

१९३३ : नाट्यमन्वंतरच्या आंधळ्यांची शाळा नाटकाचा १ला प्रयोग झाला.

१९३४ : मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश आले.

१९४७ : फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.

१९४८ : बाजारपेठेतील व्यापार्‍यांचे नेतृत्त्व करणार्‍या पूना मर्चंट्स चेंबर या संस्थेची स्थापना झाली.

१९४८ : कायदेआझम मुहम्मद अली जीना यांच्या हस्ते स्टेट बँक ऑफ पाकिस्तान या पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे उद्‍घाटन झाले.

१९४९ : त्रावणकोर आणि कोचीन ही संस्थाने एकत्र करून थिरुकोची संस्थान निर्माण झाले.

१९५५ : स्टेट बँक ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९५५ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. या आधी बँकचे नाव इंपिरिअल बँक होते.

१९६० : रवांडा व बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.

१९६१ : महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार पुणे विद्यापीठाचे चौथे कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेतले.

१९६२ : सोमालिया व घाना हे देश स्वतंत्र झाले.

१९६३ : अमेरिकेतील पत्रव्यवहारामध्ये झिप कोड वापराची सुरवात करण्यात आली.

१९६४ : न. वि. गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.

१९६६ : कॅनडा मधील पहिल्या रंगीत टेलिव्हिजन चे प्रक्षेपण टोरांटो येथून सुरु झाले.

१९७९ : सोनी कंपनी ने व्हॅकमन प्रकाशित केला.

१९८० : ओ कॅनडा हे अधिकृतपणे कॅनडाचे राष्ट्रागीत बनले.

१९९१ : सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांत अस्तित्त्वात असलेला वॉर्सा करार संपुष्टात आला.

१९९७ : सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताची कुंजराणी देवी यांना स्थान मिळाले.

२००१ : फेरारी संघाच्या मायकेल शूमाकरने जागतिक फॉर्मुला वन मालिकेतील फ्रेन्च ग्रां. प्री. शर्यत जिंकून फॉर्मुला वन मालिकेतील ५० वे विजेतेपद पटकावले.

२००२ : आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली.

२००७ : इंग्लंड मध्ये सर्व सार्वजनिक स्थानांवर धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली.

२०१५ : डिजिटल इंडिया या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

२००६ : किंघाई-तिबेट रेल्वेची सुरवात.

२००३ : ५ लाखाहून अधिक लोकांनी हाँगकाँगमध्ये देशद्रोहविरोधी कायदा मंजूर करण्याच्या प्रयत्नांविरुद्ध निषेध केला.

१९९७ : चीन - हाँगकाँग शहर-राज्यावर पुन्हा सार्वभौमत्व सुरू केले आणि १५६ वर्षांच्या ब्रिटीश वसाहतवादी राजवटीचा अंत केला.

१९७२ : गे प्राइड मोर्चा - पहिला मोर्चा इंग्लंडमध्ये झाला.

१९६८ : वॉशिंग्टन, डी.सी., लंडन आणि मॉस्को येथे ६२ देशांनी अण्वस्त्रांचा प्रसार न करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.

१९४२ : दुसरे महायुद्ध - एल अलामीनची पहिली लढाई.

१९३२ : ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन - सुरवात.

१९३१ : युनायटेड एअरलाइन्सची सुरवात.

१९३१ : विली पोस्ट आणि हॅरोल्ड गॅटी हे सिंगल-इंजिन मोनोप्लेन विमानातून संपूर्ण जगाची परिक्रमा करणारे पहिले व्यक्ती बनले.

१९२३ : कॅनडा - देशाने सर्व चीनी नागरिकांचे इमिग्रेशन निलंबित केले.

१९२१ : चिनी कम्युनिस्ट पक्षची स्थापना.

१९१६ : पहिले महायुद्ध - सोम्मेची लढाई: पहिल्या दिवशी ब्रिटिश सैन्याचे किमान १९हजार सैनिकांचे निधन तर ४० हजार सैनिक जखमी.

१ जुलै जन्म

१८८७ : कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचा जन्म.

१८८२ : भारतरत्न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९६२)

१९१३ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, रोहयो योजनेचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९७९)

१९३८ : प्रख्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म.

१९४९ : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांचा जन्म. 

१९६१ : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी २००३)

१९६६ : रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचा जन्म.

१९१३ : वसंतराव नाईक जयंती

१९७५ : भारतीय वेटलिफ्टर - पद्मश्री, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेते कर्नाम मल्लेश्वरी यांचा जन्म

१९५५ : भारतीय शैक्षणिक प्रशासक, राजीव गांधी विद्यापीठाचे कुलगुरू तामो मिबांग यांचा जन्म (मृत्यू : ६ ऑगस्ट २०२२)

१९३९ : बांगलादेश देशाचे ८वे पंतप्रधान, राजकारणी काझी जफर अहमद यांचा जन्म (मृत्यू : २७ ऑगस्ट २०१५)

१९३४ : अमेरिकन पत्रकार आणि शैक्षणिक, मोमेंट मासिकचे सह-संस्थापक लिओनार्ड फीन यांचा जन्म (मृत्यू : १४ ऑगस्ट २०१४)

१९२९ : अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि रोगप्रतिकारकशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक विजेते जेराल्ड एडेलमन यांचा जन्म (मृत्यू : १७ मे २०१४)

१९१७ : भारतीय शिक्षक, देशातील पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचा जन्म (मृत्यू : ५ नोव्हेंबर २०२२)

१८८२ : पश्चिम बंगालचे २रे मुख्यमंत्री,निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार - भारतरत्न बिधनचंद्र रॉय यांचा जन्म (मृत्यू : १ जुलै १९६२)

१ जुलै मृत्यू

१८६० : रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडईयर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १८००)

१९३८ : प्रख्यात कायदेपंडित, विद्वान दादासाहेब खापर्डे यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १८५४)

१९४१ : स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी, उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री सर सी. वाय. चिंतामणी याचं निधन. (जन्म: १० एप्रिल १८८० – विजयनगरम, आंध्र प्रदेश)

१९६२ : अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तमदास टंडन यांचे निधन.(जन्म: १ ऑगस्ट १८८२)

१९६२ : भारतरत्‍न, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य डॉ. बिधनचंद्र रॉय याचं निधन. (जन्म: १ जुलै १८८२ – पाटणा, बिहार)

१९६९ : कीर्तनकार मुरलीधरबुवा निजामपूरकर यांचे निधन.

१९८९ : कवी तसेच शिक्षणतज्ज्ञ प्राचार्यग. ह. पाटील यांचे निधन.

१९९४ : दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक राजाभाऊ नातू यांचे निधन.

१९९९ : एम अँड एम चे संस्थापक फॉरेस्ट मार्स सीनियर यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १९०४)

२०२२ : भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट राऊल निकोलाऊ गोन्साल्विस यांचे निधन (जन्म: १५ जून १९२७)

१९१२ : एरो क्लब ऑफ अमेरिका एव्हिएटरचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकी महिला, तसेच इंग्लिश खाडी पार करणाऱ्या पहिल्या महिला पायलट हॅरिएट क्विंबी यांचे निधन (जन्म: ११ मे १९७५)





  Print






News - todayspecialdays




Related Photos