महत्वाच्या बातम्या

 शाळेतील विद्यार्थ्यांच्या १० सायकली चोरणारा युवक राजुरा पोलिसांच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळा, राजुरा येथून चोरीस गेलेल्या १० सायकलींचा गुन्हा उघडकीस आणत राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही दिवसांत आरोपीला अटक करून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.दीपक मोहन आत्राम (१९), रा. इंदिरानगर, चुनाळा, ता. राजुरा असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, जिल्हा परिषद शाळा, राजुरा येथे नविन इमारतीत ठेवण्यात आलेल्या १० सायकली अज्ञात चोरट्याने लंपास केल्या होत्या. प्रत्येकी सुमारे ३ हजार रुपये किंमतीच्या या सायकलींची एकूण किंमत ३० हजार रुपये होती. याप्रकरणी शाळेशी संबंधित फिर्यादी किशोर लालाजी उईके (५५), रा. आंबेडकर वार्ड, राजुरा यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेत आरोपी दीपक मोहन आत्राम (१९), रा. इंदिरानगर, चुनाळा, ता. राजुरा याला ताब्यात घेतले.

सखोल चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सर्व १० सायकली जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ३० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी , अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, अनुप डांगे, पोअं महेश बोलगोडवार, शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी व राजीव दुबे यांनी केले. 

राजुरा पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले असून आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos