महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१७ जून महत्वाच्या घटना

१६३१ : ताजमहाल जिच्या साठी बांधला ती मुमताज बाळाला जन्म देताना मरण पावली.

१८८५ : न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे आगमन झाले.

१९४० : दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधुन माघार घेण्यास सुरूवात केली.

१९४४ : आइसलँडने (डेन्मार्कपासून) स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.

१९६३ : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.

१९६७ : चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.

१९९१ : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.

२०१३ : भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात १३ इंच पाऊस पडला. शेकडो व्यक्ती मृत्युमुखी, हजारो यात्रेकरी अडकले.

२०२२ : एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट - इंग्लिश पुरुष क्रिकेट संघाने नेदरलँड्स विरुद्ध ४९८ इतक्या सर्वात जास्त धाव केल्या.

२०२२ : चीन - फुजियान या तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकाचे लोकार्पण.

१९८५ : स्पेस शटल प्रोग्राम - STS-51-G मिशन: अंतराळात जाणारे सुलतान बिन सलमान अल सौद हे पहिले अरब आणि पहिले मुस्लिम बनले.

१९४० : दुसरे महायुद्ध - आर.एम.एस. लँकास्ट्रिया जहाज बुडाले. यात किमान ३,००० लोकांचे निधन.

१९४० : दुसरे महायुद्ध - ब्रिटीश सैन्याने फोर्ट कॅपुझो, लिबिया इटालियन सैन्याकडून जिंकून घेतला.

१७ जून जन्म

१२३९ : इंग्लंडचा राजा एडवर्ड (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १३०७)

१७०४ : फ्लाइंग शटल चे शोधक जॉन के यांचा जन्म.

१८६७ : लघुलेखन पद्धतीचा शोधक जॉनरॉबर्ट ग्रेग यांचा जन्म.

१८९८ : जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल हेर्मान यांचा जन्म.

१९०३ : संगीतशिक्षक बाबूराव विजापुरे यांचा जन्म. (मृत्यू: ७ डिसेंबर १९८२)

१९०३ : चॉकोलेट चिप कुकी चे निर्माते रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९७७)

१९२० : नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ फ्रांस्वा जेकब यांचा जन्म.

१९७३ : भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस यांचा जन्म.

१९८१ : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉटसन यांचा जन्म.

१९१२ : भारतीय पत्रकार आणि राजकारणी नित्यानंद महापात्रा यांचा जन्म (मृत्य: १७ एप्रिल २०१२)

१९०३ : भारतीय कवी, नाटककार आणि दिग्दर्शक ज्योती प्रसाद अग्रवाला यांचा जन्म (मृत्: १७ जानेवारी १९५१)

१७ जून मृत्यू

१६३१ : शाहजहानची पत्नी मुमताज महल यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १५९३)

१२९७ : ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. (जन्म: २९ जानेवारी १२७४)

१६७४ : राजमाता जिजाबाई यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १५९८)

१८९३ : भारताचे १४ वे राज्यपाल जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १७७४)

१८९५ : थोर समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर यांचा दारिद्र्य आणि दमा या विकाराने मृत्यु. (जन्म: १४ जुलै १८५६)

१९२८ : ओरिसातील समाजसुधारक गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १८७७)

१९६५ : अभिनेते मोतीलाल राजवंश ऊर्फ मोतीलाल यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१०)

१९८३ : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक शरद पिळगावकर यांचे निधन.

१९९६ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९१५)

२००४ : सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती पारीख यांचे निधन.

१९१९ : इजिप्त देशाचे ५वे राष्ट्राध्यक्ष, अभियंते, शैक्षणिक आणि राजकारणी मोहम्मद मोर्सी यांचे निधन (जन्म: ८ ऑगस्ट १९५१)

१२९७ : ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे निधन (जन्म: २९ जानेवारी १२७४)

१०३१ : Goryeo च्या Hyeonjong - कोरियन राजा यांचे निधन (जन्म: १ ऑगस्ट ९९२)





  Print






News - todayspecialdays




Related Photos