महत्वाच्या बातम्या

  आजचे दिनविशेष


१५ जून महत्वाच्या घटना

१६६७ : वैद्यकीय इतिहासात प्रथमच जॉं बाप्तिस्ते डेनिस या डॉक्टरने १५ वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचे रक्त टोचले.

१८४४ : चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.

१८६९ : महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.

१९१९ : कॅप्टन जॉन अलकॉक, लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातून सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.

१९७०: बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.

१९९३ : संपूर्ण देशी बनावटीच्या सहा अर्जुन रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.

१९९४ : इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९९७ : अजामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरारी असेल, तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.

२००१ : ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम यांनी राष्ट्रीय अ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.

२००८ : लेहमन ब्रदर्स या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.

२०२२ : इंटरनेट एक्सप्लोरर - मायक्रोसॉफ्टचे ब्रॉउसर २६ वर्षांनी बंद.

२०१२ : निक वॉलेंडा हे नायगारा धबधब्यावर यशस्वीरित्या दोरीवर चालणारे पहिले व्यक्ती बनले.

२००१ : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) - चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी स्थापना केली.

१९९१ : माउंट पिनाटूबोचा ज्वालामुखी - २० व्या शतकातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या ज्वालामुखीच्या उद्रेकात फिलिपाइन्स मधील ८०० पेक्षा जास्त लोकांचे निधन.

१९४४ : दुसरे महायुद्ध - अमेरिकेने जपानच्या दक्षिण सागरी आदेशाची राजधानी सायपनवर आक्रमण केले.

१९४० : दुसरे महायुद्ध - ऑपरेशन एरियल: जर्मनीने पॅरिस आणि बहुतेक देश ताब्यात घेतल्यानंतर मित्र राष्ट्रांच्या सैन्याला फ्रान्सच्या बाहेर काढण्यास सुरुवात केली.

१९३७ : नांगा पर्वत - जर्मन गिर्यारोहक कार्ल विएन यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेतील सोळा सदस्यांचे भुसत्खलमुळे निधन. ८००० मीटर शिखरावर एकाच वेळी झालेली हि सर्वात मोठी हानी आहे.

१९२१ : बेसी कोलमन - यांना वैमानिकाचा परवाना मिळवला, त्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन महिला वैमानिक बनल्या

१९०४ : स्टीमबोट एस.एस. जनरल स्लोकम - जहाजाला लागलेल्या आगीत किमान १ हजार लोकांचे निधन.

१५ जून जन्म

१८७८ : भारतीय-अमेरिकन गोल्फर मार्गारेट अॅबॉट यांचा जन्म. (मृत्यू: १० जून १९५५)

१८९८ : पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८६)

१९०७ : स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे यांचा जन्म. (मृत्यू: १ मे १९९३)

१९१७ : संगीतकार मेंडोलीनवादक सज्जाद हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९९५ – माहीम, मुंबई)

१९२३ : साहित्यिक केशवजगन्नाथ पुरोहित ऊर्फ शांताराम यांचा जन्म.

१९२७ : भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक इब्न-ए-इनशा यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९७८)

१९२८ : साहित्यिक शंकर वैद्य यांचा जन्म.

१९२९ : गायिका व अभिनेत्री सुरैय्या जमाल शेख ऊर्फ सुरैय्या यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)

१९३२ : धृपद गायक झिया फरिदुद्दीन डागर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे २०१३)

१९३३ : लेखिका सरोजिनी वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट २००७)

१९३७ : लोकपाल बिलासाठी आग्रह धरणारे समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्म.

१९४७ : साहित्यिक आणि नाटककार प्रेमानंद गज्वी यांचा जन्म.

१९७२ : भारतीय वकील आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सत्यपाल जैन यांचा जन्म

१९५० : किंग ऑफ स्टील, भारतीय-इंग्रजी व्यापारी - पद्मा विभूषण लक्ष्मी मित्तल यांचा जन्म

१९२७ : भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट राऊल निकोलाऊ गोन्साल्विस यांचा जन्म (मृत्यू : १ जुलै २०२२)

१८४८ : भारतीय बिशप आणि संत परुमाला थिरुमेनी यांचा जन्म (मृत्यू : २ नोव्हेंबर १९०२)

१४७९ : लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला लिसा डेल जिकॉन्डो यांचा जन्म (मृत्यू : १५ जुलै १५४२)

१५ जून मृत्यू

१५३४ : योगी चैतन्य महाप्रभू यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १४८६)

१९३१ : अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक, संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे निधन.

१९७९ : कवी गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १९२६)

१९८३ : साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९१०)

२०२२ : भारतीय साहित्य समीक्षक - पद्म भूषण, पद्मश्री गोपीचंद नारंग यांचे निधन (जन्म: ११ फेब्रुवारी १९३१)

२०२२ : भारतीय राजकारणी, तामिळनाडूचे आमदार के. के. वीरप्पन यांचे निधन

२०२० : भारतीय सैन्य अधिकारी कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू यांचे निधन

२०१६ : भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान असलम फारुखी यांचे निधन (जन्म: २३ ऑक्टोबर १९२३)

२०१३ : भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मनिवंनान यांचे निधन (जन्म: ३१ जुलै १९५४)

२००२ : तायक्वोंडो मार्शल आर्टचे निर्माते चोई हाँग हाय यांचे निधन (जन्म: ९ नोव्हेंबर १९१८)

१९९१ : सेंट लुसियन-बार्बेडियन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार डब्ल्यू. आर्थर लुईस यांचे निधन (जन्म: २३ जानेवारी १९१५)

१९७१ : अमेरिकन बायोकेमिस्ट आणि विषाणूशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार विजेते वेंडेल मेरेडिथ स्टॅनली यांचे निधन (जन्म: १६ ऑगस्ट १९०४)





  Print






News - todayspecialdays




Related Photos