महत्वाच्या बातम्या

 चामोर्शी - ट्रॅक्टर उलटल्याने हमाल ठार, चालकासह एक जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल येथून हार्डवेअरचे साहित्य लखमापूर बोरीकडे नेताना ५ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भेंडाळाजवळ एक गंभीर अपघात घडला. अपघातात हमाल जागीच ठार झाला, तर ट्रॅक्टर चालकासह आणखी एक हमाल जखमी झाला आहे.

मयताची ओळख विलास भोयर (वय ४५, रा. लखमापूर बोरी) अशी करण्यात आली आहे. जखमी झालेल्या चालकाचे नाव कृष्णा देवाजी भोयर आणि दुसऱ्या हमालाचे नाव बाबूराव सोमा भोयर आहे. दोघांनाही उपचारासाठी तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताच्या ठिकाणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅक्टरवरील माल मूळ येथून लखमापूर बोरीकडे नेले जात होता. लखमापूर बोरी येथील हार्डवेअरचे दुकानदार मनोज बाहेती यांच्या स्वतःच्या ट्रॅक्टर (एमएच ३३ एफ - ३६४) मध्ये हा माल नेला जात होता. भेंडाळाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रॅक्टर उलटल्याचे अंदाज आहे.

याबाबत मनोज बाहेती यांच्या फिर्यादीवरून चालक कृष्णा भोयरविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हवालदार श्यामल पौळ करत आहेत.

सदर अपघातामुळे स्थानिक परिसरात काळजीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी दुर्घटनेचे सविस्तर पंचनामे करून जखमींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos