सिरोंचा नगर पंचायतमध्ये मान्सूनपूर्व तयारीबाबत निवेदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / सिरोंचा : आगामी मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीजन्य आजारांना आळा बसावा यासाठी नगरसेविका नुसरत बाबर शेख यांनी सिरोंचा नगर पंचायतच्या अध्यक्षा पद्मा भोगे यांना निवेदन सादर केले.
या निवेदनामध्ये शहरातील नाल्यांची स्वच्छता, पाणीपुरवठा पाइपलाइनची साफसफाई, रस्त्यांची स्वच्छता तसेच विहिरींची स्वच्छता यांसारखी मान्सूनपूर्व कामे तातडीने हाती घेण्याची मागणी करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण झाल्यास नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध होईल आणि पाणीजन्य आजारांचा धोका कमी होईल, असे नगरसेविका नुसरत शेख यांनी यावेळी सांगितले.
यावर अध्यक्षा पद्मा भोगे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शहरातील सर्व आवश्यक मान्सूनपूर्व कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी नगरसेवक सतीश भोगे, रणजीत गागापूरवार, भगवान पिल्लीवार (काका) तसेच इज़हार शेख उपस्थित होते. छायाचित्र ओळ: मान्सूनपूर्व तयारीची कामे तातडीने हाती घेण्याबाबत नगरसेविका नुसरत बाबर शेख यांनी सिरोंचा नगर पंचायतच्या अध्यक्षा पद्मा भोगे यांना निवेदन सादर करताना उपस्थित मान्यवर.
News - Gadchiroli




Petrol Price




