एटापल्लीत तरुणाची गळफास लावून आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यातील गुरुपल्ली येथे एका २६ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावावर शोककळा पसरली आहे.
संतोष जगन्नाथ हजारे (२६ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या मृत तरुणाचे नाव आहे.
घरात कोणी नसताना उचलले टोकाचे पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी संतोष याच्या घरात इतर कोणीही सदस्य नव्हते. घरात कोणी नसण्याची संधी साधून संतोष हजारे याने आपल्या राहत्या घरातील छताला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. काही वेळानंतर हा प्रकार शेजाऱ्यांच्या आणि नातेवाइकांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने पाहिले असता संतोषने गळफास घेतल्याचे उघड झाले.
पोलिसात मर्ग दाखल
या घटनेची माहिती मिळताच एटापल्ली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या प्रकरणी एटापल्ली पोलिस ठाण्यात सध्या मर्ग (अकस्मात मृत्यू) दाखल करण्यात आला असून, तरुणाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
News - Gadchiroli




Petrol Price




