महत्वाच्या बातम्या

 विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेतील कुस्तीपट्टूंचा गौरव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : अचलपूर, जिल्हा अमरावती येथे पार पडलेल्या ३८ व्या विदर्भ केसरी कुमार मुले व मुलींच्या कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कुस्तीपट्टूंना आज हॉटेल लँडमार्क येथे आयोजित कार्यक्रमात प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

माजी खासदार तथा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ पुणेचे अध्यक्ष रामदासजी तडस यांच्या हस्ते सहभागी खेळाडूंना प्रशस्तीपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देत कुस्ती क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजि. प्रमोदजी पिपरे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र कुस्तीगीर संघ गडचिरोली तथा संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे हे होते.

यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे,चंद्रगुप्त कुनघाडकर जिल्हा सचिव गडचिरोली जिल्हा कुस्तीगिर संघ, भाजपा किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, जिल्हा सचिव विलासजी भांडेकर, प्रा.अरुण उराडे, काटवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.स्पर्धेत सहभागी कुस्तीपट्टू प्रणय जुवारे, तन्मय वाघाडे, भरत भांडेकर, तन्मय जुवारे, विजय शेंडे, प्रणव पिंपळे व जय बोरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos