व्यवसाय वाढविण्यासाठी पैश्याची नाही तर आत्मबलाची गरज यतींद्र त्रिपाठी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : व्यवसाय वाढविण्यासाठी पैश्याची गरज फार कमी असते तर मनात असलेला आत्मविश्वास तुम्हाला यशस्वी करतो त्याकरिता व्यवसाय उभारताना संथगती ठेवून काम करावे पण हि संथगती अविरतपणे सुरु राहावी असे प्रतिपादन युनिअन बँकेचे प्रबंधक यतीन्द्र त्रिपाठी यांनी केले.
ते ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी ) गडचिरोली यांच्या फास्ट फूड उद्यमी या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
या प्रसंगी अग्रणी जिल्हा प्रबंधक प्रशांत ढोंगळे , आरसेटि चे संचालक नागेश आष्टीकर, वरिष्ठ कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम, पुरुषोत्तम कुनघाडकर, आरसेटि श्रेष्ठता केंद्राच्या प्रतिनिधी गीता मेडपिलवार आणि प्रशिक्षणार्थी युवती उपस्थित होत्या.
आपल्या मार्गदर्शनात अग्रणी जिल्हा प्रबंधक प्रशांत ढोंगळे यांनी व्यवसायाच्या आर्थिक आणि इतर मदतीसाठी आरसेटि आणि बँक नेहमी तयार आहेत आपण फक्त सुरुवात करावी आणि आपला आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावला जावा याकरिता नेहमी प्रयत्नशील असावे.
आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून नागेश आष्टीकर यांनी आपल्या पदार्थांची चव कधी कमी होऊ देऊ नका म्हणजे तुमचा व्यवसाय नेहमी वृद्धिंगत होत राहील यात काही शंका नाही असे प्रतिपादन केले.
आपल्या मनोगतातून प्रशिक्षणार्थी कांता गुंनूरकर , तसेच रतनशाह कुमरे यांनी आपल्या १२ दिवसीय प्रशिक्षणाचा आढावा घेतला. आणि लवकरच आपला स्वतःचा व्यवसाय उभारन्याचे आश्वासन दिले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात विद्या नगराळे यांचे अमूल्य योगदान लाभले तसेच आर सेटी चे माजी प्रशिक्षणार्थी तसेच शहरातील केक चे निर्माता स्वप्नील बाबनवाडे यांनी विविध केक तयार करण्याची प्रक्रिया प्रशिक्षणार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली.
या समारोपीय कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन पुरुषोत्तम कुनघाडकर यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचे सहकार्य लाभले.
News - Gadchiroli




Petrol Price




