आजचे दिनविशेष


११ मे महत्वाच्या घटना
१५०२ : ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.
१८११ : चँग आणि एंग (बंकर) या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा एका चिनी दांपत्याच्या पोटी जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १८७४)
१८५७ : १८५७ चा राष्ट्रीय उठाव – भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.
१८५८ : मिनेसोटा अमेरिकेचे ३२ वे राज्य झाले.
१८६७ : लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.
१८८८ : मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.
१९४९ : इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.
१९४९ : सियाम या देशाने अधिकृतरीत्या दुसऱ्यांदा आपले नाव बदलुन थायलंड केले.
१९९६ : १९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती: एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शिखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.
१९९८ : २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.
१९९९ : टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील १,००० वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला
१९९८ : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
११ मे जन्म
१९०४ : स्पॅनिश चित्रकार साल्वादोर दाली यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १९८९)
१९१२ : भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि पटकथालेखक सादत हसन मंटो यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९५५)
१९१४ : संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट २००१)
१९१८ : क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रिचर्ड फाइनमन यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९८८)
१९४६ : कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डियोलॉजिस्ट रॉबर्ट जार्विक यांचा जन्म.
१९६० : अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म.
१९७५ : एरो क्लब ऑफ अमेरिका एव्हिएटरचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकी महिला, तसेच इंग्लिश खाडी पार करणाऱ्या पहिल्या महिला पायलट हॅरिएट क्विंबी यांचा जन्म. (मृत्यू : १ जुलै १९१२)
१९१६ : स्पॅनिश लेखक आणि राजकारणी - नोबेल पुरस्कार कॅमिलो जोसे सेला यांचा जन्म (मृत्यू : १७ जानेवारी २००२)
११ मे मृत्यू
१८७१ : ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक सर जॉन विल्यम हर्षेल यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १७९२)
१८८९ : कॅडबरी कंपनी चे संस्थापक जॉन कॅडबरी यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८०१)
२००४ : चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचे निधन. (जन्म: २७ मे १९१३)
२००९ : भारतीय नौसेनाधिपती सरदारिलाल माथादास नंदा यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९१५)
२०२२ : राजकारणी, खासदार आणि मंत्री पंडित सुख राम यांचे निधन (जन्म: २७ जुलै १९२७)
२०२२ : भारतीय संस्कृत व्याकरणकार, भाषाशास्त्रज्ञ व योगी - पद्मश्री भगीरथ प्रसाद त्रिपाठी यांचे निधन (जन्म: १५ जुलै १९३५)
२०२२ : भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार रमेश लटके यांचे निधन (जन्म: २१ मे १९७०)
१९९६ : नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष ननामदी अझीकीवे यांचे निधन (जन्म: १६ नोव्हेंबर १९०४)
१९८६ : व्यावसायिक फुटबॉल खेळणारे पहिले आफ्रिकन-अमेरिकन कृष्णवर्णीय व्यक्ती फ्रिट्झ पोलार्ड यांचे निधन (जन्म: २७ जानेवारी १८९४)
१९८१ : जमैकन संगीतकार बॉब मार्ली यांचे निधन (जन्म: ६ फेब्रुवारी १९४५)
१९८१ : नॉर्वेजियन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक ऑड हॅसल यांचे निधन (जन्म: १७ मे १८९७)
१७६० : बर्मी देशाचे राजा अलौंगपाया यांचे निधन (जन्म: २४ ऑगस्ट १७१४)
१७०८ : फ्रेंच वास्तुविशारद, शॅटो डी डॅम्पियर आणि ग्रँड ट्रायनॉनचे रचनाकार ज्युल्स हार्डौइन-मन्सार्ट यांचे निधन (जन्म: १६ एप्रिल १६४६)
१७०८ : फ्रेंच वास्तुविशारद, शॅटो डी डॅम्पियर आणि ग्रँड ट्रायनॉनचे रचनाकार ज्युल्स हार्डौइन-मन्सार्ट यांचे निधन (जन्म: १६ एप्रिल १६४६)
News - todayspecialdays




Petrol Price




